Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

हिंजवडीत डंपरखाली चिरडून दोन तरुणींचा दुर्देवी मृत्यू

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी महान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे वेगात असलेला रेडमिक्स डंपर पलटी होऊन दोन तरुणींचा जागिच मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंजवडीकडून रेडिमिक्सने भरलेला डम्पर एमएच 12/एक्सएल 5744 हा महाळुंगेच्या दिशेला चालला होता. वडजाईनगर कॉर्नर परिसरात आल्यानंतर वळण घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो पलटी झाला. त्यांचेवेळी तिथून स्कुटरवर दोन तरुणी चालल्या होत्या. त्या दोघी गाडी सह डम्पर खाली चिरडल्या गेल्या. यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस पोहचले असून, क्रेनच्या सहाय्याने रेडिमिक्स डम्पर उचलून दोघींना बाहेर काढण्याचे काम सुरु असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या दोन्ही तरुणी आयटी अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, या दुचाकीवरून दोघी चालल्या होत्या. मात्र त्या दोघीवर दुर्देवी मृत्यू ओढवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »