Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

दुकानात ताक आणण्यासाठी गेलेल्या आईच्या मागे धावली चिमुरडी..पण अनर्थ घडला

जळगाव : आजच्या धावत्या युगात जिवावर बेतणाऱ्या अनेक घटना आपल्या अजुबाजूला घडताना आपण पाहतो. तूटच जळगाव येथून एका हृदय हेलवणारी घटना समोर आली आहे. आई ताक आणण्यासाठी बाहेर दुकानात गेली. मात्र आई पाठोपाठ तिची चिमुरडी देखील तिच्या पाठीमागे धावत गेली. मात्र,रस्त्यावर आल्यावर एका वेगात असलेल्या चारचाकी चालकाने तिचा उडवले. त्यात त्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना पाहून अनेकांचे मन हेलावणारे आहे.

प्रियांशी असे त्या चिमुकलीचे नाव असून आईच्या डोळ्यासमोर हा आपघात घडल्याने आईला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारच्या सुमारास सुवर्णा संदीप मेटल्य या दुकानात ताक आणण्यासाठी रस्ता ओलांडून जातं असताना त्यांच्या मागे मागे त्यांची दीड वर्षांची मुलगी प्रियांशी पळत पळत येत होती. त्यांचवेळी ग्रामपंचायतिकडून चांग्यानिम चौकाकडे जाणारी चारचाकी याने भराधाव वेगात चालवून प्रियांशीला धडक दिली. तिच्या अंगावरून चाक गेल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी चारचाकी चालक पंकज अरुण धनगर रा. कमळगांव ता. चोपडा याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी आईने फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »