पुणे : पुण्यातून लग्नासाठी कारने नाशिकला निघालेल्या दाम्पत्याचा पुणे – नाशिक महामंर्गाववर असणाऱ्या माळवाडी शिवाराजवळ भीषण अपघात होऊन पत्नी पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाजन गंभीर जखमी झाला आहे.
सचिन वसंतराव दरेकर (वय ५७ ), रमा सचिन दरेकर (वय ५३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख हे देखील त्यांच्यासोबत होते. त्यातील एकाजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी हा अपघातात घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पुण्यातील गुरुवार पेठ-दरेकर वाडा येथील सचिन वसंतराव दरेकर, रमा सचिन दरेकर , सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख असे चौघे जण रविवार दि.२६ रोजी पहाटे साडेपाच वाजता कारमधून नाशिकला लग्नासाठी नाशिक येथे जातं होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात आले असता अपघात झाला. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सचिन दरेकर व रमा दरेकर यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तर गंभीर जखमी सीमा देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेने दरेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मयत सचिन दरेकर यांचे भाऊ सतीष वसंतराव दरेकर यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे हे करत आहे.
Leave a Reply