Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

खेड शिवापुर टोल प्लाझा येथे दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप

पुणे : सध्या सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचा एक भाग म्हणून दि. 25 रोजी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि पीएसटोल रोड प्रायव्हेट लिमिटेड. यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दुचाकी स्वरांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. दुचाकी स्वरांना हेल्मेट वापराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी अधिकारी सिद्धेश भांगे – मॅनेजर , श्रीमती कृपा चव्हाण – मॅनेजर , शंकर मसाले – उपव्यवस्थापक , संतोष कटके असिस्टंट मॅनेजर ,संतोष चोरमले व्यवस्थापक खंडाळा रिलायन्स इन्फ्रा व पीएस टोल अधिकारी अमित भाटिया- रिलायन्स मुख्य व्यवस्थापक , अनिल राठोड- DGM, ओमशेस सर-असिस्टंट मॅनेजर रिलायन्स इफ्रा ,अनिल सिंघ DGM, राकेश कोळी, अभिजित गायकवाड , संकेत गांधी , मोहन धुमाळ , आकाश चोरघे व टोल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »