Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

खेड शिवापूर टोलनाक्यावर हेल्मेट आणि सीटबेल्ट जनजागृती अभियान

पुणे : सध्या सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्या अंतर्गत, दि. २९ रोजी पीएस टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राजगड पोलीस व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शिवापुर टोल नाक्या येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमांतर्गत, हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांना व सीटबेल्ट वापरणाऱ्या चारचाकी चालकांना फुलांच्या कुंड्यांचे वाटप करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला. या अभियानाचा उद्देश वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देणे व सुरक्षित प्रवासाची जाणीव निर्माण करणे हा होता.

या कार्यक्रमाला महामार्ग पोलीस PSI विनायक कापसे,राजगड पोलीस ठाण्याचे ASI अंबादास भुरटे, रिलायन्सचे मुख्य व्यवस्थापक अमित भाटिया, ऑपरेशन्स आणि देखभाल प्रमुख दीपक भिष्ट, DGM बद्री प्रसाद शर्मा, DGMअनिल सिंग, रूट ऑपरेशन मॅनेजर अभिजित गायकवाड, टोल मॅनेजर मोहन धुमाळ, कंट्रोल रम ऑफिसर आकाश चोरघे तसेच टोल नाक्यावरील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम हेल्मेट व सीटबेल्टच्या वापराबाबत जनजागृती करून रस्ते अपघात टाळण्यास मदत करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »