पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील भवानीनगर येथे मुलीच्या प्रेमसंबधावरुन दोन विद्यार्थ्य्यांच्यावर काेयत्याने वार केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच विद्यार्थ्य्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदनान महंमद शेख ( वय १९, रा.सणसर), पियुष प्रथम चव्हाण ( वय १९,रा.सणसर), यशराज गणेश अरवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या मारमारीमध्ये सुजल जाधव हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शुक्रवार (दि. ३१) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संचित घोळवे व सुजल जाधव व त्यांचे सहकारी मित्र भवानीनगर भवानीमातेच्या मंदिरामध्ये बसले असताना अदनान शेख ,पियुष चव्हाण , यशराज अरवडे व दोन अल्पवयीन मित्र असे पाच जणांनीसुजल जाधव व संचित घोळवे यांना लाथांनी मारहाण केली. संचित घोळवे, सुजल जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले.
सदरच्या घटनेचे माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे व पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर यांनी तातडीने मुलांना ताब्यात घेवून कारवाई केली.
प्रेमसंबधातुन कोयत्याने वार…
कोयता हल्ला मुलीच्या प्रेमसंबधातुन झाला आहे. गुरुवारी प्रेमसंबधातुन वाद झाला होता. मात्र तो विद्यार्थ्यांनी आपआपसात मिटवला असल्याचे पाेलिसांनी सांगितले आहे. आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले असून या कोयत्याच्या हल्लानंतर आरोपी पुणेच्या दिशेने पळून चालले होते. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने वेगवेगळी दोन पथके तयार करुन पुणेच्या दिशेने रवाना केली. आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करुन सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्थानिक गावकरी यांच्या मदतीने शिफातीने अटक केली.
Leave a Reply