पुणे : बारामती आगाराच्या एसटी बस चालकाला जेजुरी बस थानकावर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी मुरूम ते पुणे प्रवासाला निघालेली एसटी बस थानकात थांबल्यानंतर एसटीबस चालक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने स्थानकारवरच बेशुध्द पडले. यावेळी त्यांना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले.
निलेश एकनाथ शेवाळे (वय ५२)असे चालकाचे नाव आहे. शेवाळे हे गुरुवारी(दि ३०) मुरुम येथून पुणेच्या दिशेने निघाले होते. यावेळी सकाळी ७.३० च्या सुमारास एसटी बस जेजुरी बस थानकावर आल्यानंतर शेवाळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र,त्यातच ते बेशुध्द पडले.त्यांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,त्यांचे निधन झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.जेजुरी येथे एसटी बस थांबल्यावर ही घटना घडली आहे.
याबाबत बारामती आगाराचे आगार व्यवस`थापक रविराज घोगरे यांनी सांगितले कि, जेजुरी बस`थानकात एसटी बस थांबल्यावर निलेश शेवाळे यांना त्रास जाणवू लागला. शेवाळे यांनी याबाबत त्यांच्या सहकार्यांना सांगितले. मात्र, ते बेशुध्द झाले. त्यांना तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शेवाळे यांच्यावर त्यांच्या निरा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे घोगरे यांनी सांगितले.
Leave a Reply