Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

आधी आंदोलनात गाडी जाळली, नंतर दोन लाख उधळले आता थेट साडी घालून आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पायगा गावाव्हे सरपंच मंगेश साबळे हे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी कार जाळून आंदोलन केले होते, त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाबाहेर 2 लाख रुपये उधळणारे साबळे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गावाच्या प्रश्नासाठी त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे.

गावातील पाणी प्रश्न आणि महिलांना डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणावे लागते, यासाठी त्यांनी थेट साडी घालून आणि डोक्यावर हंडा ठेवून थेट जिल्हा परिषदेत आले. आपण सरपंच होऊन देखील गावाचा पाणी प्रश्न सोडवू शकलो नाही, कारण ठेकेदारांनी ते काम केले नसल्याचे साबळे यांनी सांगत, आपण याबाबत प्रशासनाला जागे करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो असल्याचे साबळे यांनी सांगितले.

यावेळी माध्यमंशी बोलताना साबळे म्हणाले की, मी आज सरपंच म्हणून या जिल्हा परिषद कार्यालयात आलेलो नाही. मी आज माझ्या गावातील महिलांना पाण्यासाठीचा होणारा त्रास त्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी मी आज आलो आहे.

माझ्या गावात प्यायला पाणी नाही. शुद्ध पाणी नव्हतं म्हणून मी आडात बसून आंदोलन केलं होत. त्या महिलांनी मला मतदान केलं आणि मी सरपंच झालो. पण मी सरपंच होऊन दोन-अडीच वर्षे झाली. पण मी अद्याप पाणी देऊ शकलो नाही. तसेच जलजीवन मिशनचं कामाला सुरुवात व्हायला चार वर्षे झाली पण अजून पूर्ण झालेलं नाही”, अशी खंत मंगेश साबळे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »