Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

मनसेने ठेवली स्व. रमेश वांजळे यांची आठवण, खडकवासला साठी मयुरेश वांजळे यांना उमेदवारी

हडपसरला साईनाथ बाबर तर कोथरूडमधुन किशोर शिंदे

पुणे : राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहत आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघडीची यादी जाहीर होईल असे असताना आता मनसेची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुण्यातील तीन मतदार संघात मनसेने उमेदवार दिले आहेत. मनसेने 45 जणांची यादी जाहीर केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्षात तयारी करत असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पुण्यातील महत्वाच्या मतदार संघात मनसेने उमेदवार दिले आहेत. त्यात पुण्यातील कोथरूड मतदार संघातून किशोर शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळाली आहे. आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेचे सोनेरी आमदार स्व. रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

रमेश वांजळे यांची आठवण ठेवत मनसेने ही उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश वांजळे यांनी केलेलं कार्य लक्षात घेता त्यांच्या मुलाला ही संधी मिळणे हे महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे पुण्यात मनसेने आपले उमेदवार देऊन निवडणुकीतील रंगत वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »