वेल्हे : कोंडगाव (ता.राजगड) शाळेतील शिक्षक मोठ्या उत्साहात विविध वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवत असल्याने येथील विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळवलेले यश हे कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार माजी उपसभापती अनंता दारवटकर यांनी केले.
रविवार (ता.२६) रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी दारवटकर बोलत होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना सन्मानित करताना पुणे जिल्हा परिषद आयोजीत यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या स्पर्धामध्ये कोंडगाव शाळेतील विद्यार्थी जयेश विठ्ठल दारवटकर,माही पांडुरंग दारवटकर या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजूषा (लहान गट) या स्पर्धेत जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला होता त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.या विद्यार्थ्यांना भाग्यश्री गरड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी कोंडगावच्या सरपंच पूनम दारवटकर, माजी सरपंच सागर दारवटकर,पानशेत बीटच्या प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी राजश्री गावडे, केंद्रप्रमुख रांजणे, शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास डिंबळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ग्रामस्थ, पालक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
.
Leave a Reply