पुणे : पुण्यात गुन्हेगारी डोकेवर काढत असताना पुणे पोलिसांनी बनावट जामिनदारांचे रॅकेट उध्वस्त केले आहे. वानवडी पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात 11 आरोपीना अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी काही वकीलांच्या मदतीने बनावट जामीनदार तयार केले जात होते.
हे बनावट जामीनदार आरोपींच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करून, खोटे आधारकार्ड, रेशनकार्ड आणि ७/१२ उतारे तयार करत होते. बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपींना जामीन मिळवून दिले जात होते. ४ जानेवारी २०२५ रोजी लष्कर कोर्ट आवारात या आरोपीना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. आणि तुनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ९५ संशयित रेशनकार्ड, ११ संशयित आधारकार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे, मोबाईल हँडसेट आणि डिओ मोपेड असा एकूण ८९,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत
Leave a Reply