Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पुण्यात प्रेमभंगातुन पोलिसाच्या मुलाची आत्महत्या

पुणे: पुणे पोलीस दलात सत्र वाढू लागले आहे. खडकी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणवल्यात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारच्या सुमारास शिवाजीनगर येथे पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्म्हत्या केली आहे.

ऋषिकेश दादा कोकणे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेतला. ज्यावेळी सकाळची शेजारी उठवण्यासाठी गेले तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा तोडल्यानंतर ऋषिकेश लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रेमभंग झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »