शिरूर : विधानसभेची रनधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यात शिरूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना टक्कर देण्यासाठी महायीतिकडून माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे शिरूर विधानसभेची लढत अत्यंत चूरशीची होणार असल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे शरद पवरांच्या शिलेदाराला अजित पवारांचा शिलेदार भारी पडणार अशी चर्चा देखील सुरु झाली आहे.
सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरणार असल्याचा निर्धार देखिल त्यांनी केला आहे. महायुतीची एकजुट आणि मतांमध्ये संघटित बळ निर्माण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. प्रदीप कंद यांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट केले की, “महायुतीच्या नेतृत्वासाठी आणि माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरतो असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी माऊली कटके यांच्यामागे ताकत उभी केली आहे. माऊली कटके हे जनतेत ‘श्रावणबाळ’ आणि सेवाभावी नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. त्यांची साधी राहणी, मृदू भाषा, आणि जनसंपर्कातील तळमळ यांनी मतदारांवर ठसा उमटवला आहे. विकासकामे करत माणुसकी जपणारे, कोणाविषयी आकस न ठेवता मदत करणारे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
थेट जनतेशी संवाद….
शिरूर मतदारसंघातील सत्ताधारी आमदार अशोक पवार यांना कटके यांनी जनतेशी थेट संवाद साधत जोरदार आव्हान दिले आहे. ‘ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) यांच्या विजयासाठी आक्रमक मोहीम’ सुरू केली असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. माघार घेणारे नेते देखील कटके यांच्या प्रचारात आक्रमकपणे उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा ठाम संकल्प केला आहे.
त्यामुळे शिरूर विधानसभेत अशोक पवार यांच्या तुल्यबळ असा उमेदवार अजितदादानी दिला असल्याने अशोक पवार चांगलेच आव्हान निर्माण झाल्या असल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
जनतेच्या मनातील ‘आपला माणूस’ म्हणून माऊली कटके यांच्याविषयी निर्माण झालेली भावना आणि महायुतीची प्रखर मोहीम बघता, शिरूर मतदारसंघात महायुतीचा विजयाकडे सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.