पुणे : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात रात्रीच्या वेळी वाहनांमधील डिझेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच टेम्पो मधील चोरी झाल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल झाली होती. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी त्या फिर्यादीची दखल घेत एखाद्या सिनेमात जासी डिझेल चोरी करणारी टोळी पकडली तशी आळेफाटा पोलिसांनी हि डिझेल चोरी करणारी टोळी पकडली आहे.
यात पोलिसांनी राजाराम कनिराम परमार, फिरोज अजीज खान, ओमप्रकाश राधेश्याम बैरागी, कल्लू खॉ रुस्तम मन्सूरी, विनोद नारायण सिंग राहणार मध्यप्रदेश यांना मुद्दे मालासह या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हि कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चंद्रा डुंबरे, सुनील गिरी, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, प्रल्हाद आव्हाड, नवीन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, दिपक नागरे, प्रवीण आल्हाट, कांचन रानडे विशाल पालवे यांनी केली आहे.
Leave a Reply