Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पतीची आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने पत्नीने चिमुकलीसह संपवले जीवन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आत्महत्या केल्याचा विरह सहन ना झाल्याने पत्नीने आपल्या चार वर्षांच्या लेकीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. ह्या घटनेमुळे माढा तालुक्यातील घाटणे गावावर शोककळा पसरली आहे.

जनाबाई हरिभाऊ लोंढे (३२) व मुलगी साजरी हरिभाऊ लोंढे (४) असे मयत झालेल्या मायलेकींची नावे आहे. रविवारी सकाळी हि घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, ६ फेब्रुवारी हरिभाऊ जणू लोंढे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पतीच्या आत्महत्येनंतर पदरात असलेल्या मुलीचा सांभाळ कसा करायचा हा गहन प्रश्न पत्नीसमोर होता. याच विचारात पत्नी आपल्या मुलीसह घरातून निघून गेली. तीन दिवसांच्या कालावधीनांतर मायलेकींचा मृतदेह जवळच्या विहिरीत सापडला आहे. बेपत्ता झालेल्या पायलेकींचे मृतदेह विहिरीत आढळल्याने स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »