डिंग्रजवाडी येथे माऊली कटके यांचे जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत भव्यदिव्य स्वागत
शिरूर : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) आमदार अशोक पवार हे बंद सम्राट असून घोडगंगा कारखाना बंद पाडण्याचे पाप, शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे महापाप केले आहे. यशवंत कारखाना सुरू करतो म्हणत घोडगंगा बंद पाडला. यशवंत तर सुरू नाही केला. पण घोडगंगेचा यशवंत करत बंद पाडला. पुणे नगर रस्त्यावरील ट्रॅफिक जॅम समस्या मागील दहा वर्षांपासून तशीच असून नावाला कार्यसम्राट प्रत्यक्षात बंदसम्राट असून, मी लोकांना लुटून सहकारातील उद्योग बंद पाडून उद्योगधंदे उभे नाही केले तर बाप जाद्यांच्या जमिनीवर कर्ज काढून काम केले असल्याचे प्रचार दौऱ्यावेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी जोरदार घणाघात केला.
यापुढे माऊली कटके यांनी येथील आबासाहेब गव्हाणे हे सुसंस्कृत व उच्च विद्याविभूषित आदरणीय असून तालुक्याने न पाहिलेले आमदार असून त्यांच्या सारखी, निरपेक्ष व प्रामाणिक व खरी माणसे हीच या गावचे वैभव आहे. विरोधक चुकीचे बोलत आहेत. त्यांच्यासारखे वीस हजार लोकांच्या चुलीत पाणी ओतण्याचे पाप केले नाही नाही तर हजारो लोकांना काशी, उज्जैन दर्शन घडवण्याचे पुण्याचे काम केलं असून चासकमान पाण्याचा प्रश्न सोडविणार आहे. हेड टू टेल सर्वांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकोणीसशे कोटींचा निधी दिला आहे. शासन धर्मविर छञपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक साकारणार आहे, राज्यात महायुतीचे सरकार येणार असून लाडकी बहिण योजना सुरू राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या लोकांसाठी पोलीस स्टेशनला फोन करून गोरगरीब,सर्वसामान्य जनतेला त्रास देणार नाही, महसूल, पुनर्वसन येथे आमचे दलाल नाही, शाळा ,कारखाने बंद पाडणार नाही की तुमचा मुलगा,भाऊ म्हणून काम करेन जिथे चुकेल तिथं कानाला धरा तो तुमचा अधिकार असून शेतकऱ्याचा मुलगा आहे. इथल्या मातीची आणि जनतेची मुलगा म्हणून सेवा करीन असे माऊली कटके यांनी सांगताच उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आमदार अशोक पवार यांनी शेतकऱ्यांचा कारखाना बंद पाडण्याचे पाप केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करतायेत कारखाना तुमच्या ताब्यात असताना व २५ वर्षे सत्ता असताना कारखाना बंद पडतोच कसा ? पंचवीस वर्षांत कारखान्यावर एव्हढे कर्जच कसे झाले हे सांगा. उगाच स्वतःचे पाप झाकायचे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्यावर खोटे आरोप लावू नका. ३५८ कोटींचे कर्ज दिले असून आमदार खोटा प्रचार करत असून उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा व स्वतःचे पाप झाकण्याचा केविलवाणा प्रकार करत असून जनता त्यांचा खोटारडेपणा ओळखून आहे.
या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे बदलले असून सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली. यामध्ये महिला भगिनी आघाडीवर आहेत.माऊली कटकेंसारखा घरातला उमेदवार समाधान व आनंद देणारा ‘आपला माणूस’ समोर असल्यावर मतदान तर होणार पण आशीर्वाद व माणुसकीच्या ओलाव्याने जिंकणार व मताधिक्य मिळणार असून तुमच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांनी माऊली कटके निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केल्यावर महिला भगिनी व तरुणांनी टाळ्या वाजवत समर्थन करत विश्वास दाखवला.
आमदार अशोक पवार यांच्या घरात पदांची खैरात
आमदार अशोक पवार यांना दोन वेळा आमदारकी, बायको जिल्हा परिषद सदस्या व सभापती,पोरग कारखान्याचा चेअरमन ,हे महाशय जिल्हा बँकेवर संचालक आणि आता मंत्री पदासह पालकमंत्री व्ह्यायची स्वप्ने पाहत असून एकच घरात किती पदे द्यायची इतरांना संधी देणार की नाही ? स्वतःचा घरात पदांची खैरात करणार हे बरोबर नाही.
हलगी ताशांचा कडकडाट, फटाकड्यांची आतषबाजी ,घोड्यावर बसलेले उमेदवार माऊली कटके यांच्यावर जे सी बी तून फुलांची मुक्त हस्ते उधळण आणि ‘जय महाकलेश्वर’ चा जयघोष करत , महिला भगिनिंचा ओसंडून वाहणारा उत्साह ,तरुणाईचा उदंड प्रतिसाद तर ज्येष्ठांचे आशीर्वाद , फुलांच्या पायघड्या तर मोठ्या प्रमाणात महिला भगीनिंच्या हस्ते महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचे औक्षण करत ग्राम दैवताच्या साक्षीने शिरूर तालुक्यातील एक नंबरचे मतदान देऊन विजयी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी सभापती मोनिका हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, संचालक दादा पाटील फराटे,महेश ढमढेरे, राहुल पाचर्णे, शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, माजी संचालक कैलास सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, शिवाजी दरेकर, शिवसेनेचे रामभाऊ सासवडे,भाजपचे बाबासाहेब दरेकर, नारायण फडतरे, सरपंच प्रकाश गव्हाणे , विविध पदाधिकारी, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.