Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी गडचिरोली येथे विद्यापीठाचे खेळाडू रवाना

पुणे : २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धांचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे दिनांक १७ ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण २३ विद्यापीठांचे संघ सहभागी होत आहेत.

या स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, खोखो, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल मुले व मुली संघातील सुमारे 150 खेळाडू व 25 संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक यांचा चमू सहभागी सहभागी होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघास शुभेच्छा देण्यासाठी प्रा. डॉ.पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. सुदाम शेळके, सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार), क्रीडा मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिवाजी उत्तेकर, सहाय्यक कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपस्थित होते.

प्रा. डॉ. पराग काळकर  यांनी विद्यापीठाची क्रीडा महोत्सव स्पर्धा जिंकण्याची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित केले. जिंकण्यासाठी मनाच्या एकाग्रतेचे महत्त्व सांगीतले. सर्व खेळाडूंनी खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करून आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचे आवाहन सर्व खेळाडूंना करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »