पुणे : सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू झाला. हि घटना वारक – चाचीवली गावच्या हद्दीत घडली.
यामध्ये फतेचंद सायन्स कॉलेज थेरगाव मध्ये 11 वी त शिकणारा विशाल रवी राठोड (वय – 18 ) डी वाय पाटील कॉलेज मधील अनिश मनोरंजन राऊत (वय 19) पिंपरी दोघेही रा. पवार नगर, थेरगाव येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.
हे दोघे रविवारी सकाळी 11. 30 च्या दरम्यान ताम्हिणी घाट परिसरात मित्रा समवेत आले होते. यावेळी चाचीवली गावच्या हद्दीत मुळशी धरणात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान विशाल ला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला असताना अनिश त्याला पकडण्यासाठी गेला असता. यावेळी दोघेही बुडाले. या घटनेची माहीती त्यांच्या अन्य मित्रांना कळविली असता.
पौड पोलीस स्टेशनचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक संतोष कुंभार, बिट पोलीस अधिकारी समीर शेख पोलीस,यांनी तात्काळ मुळशी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रमोद बलकवडे व त्यांचे अन्य सहकारी स्कुबा तज्ज्ञ विजय शिवतरे, दिपक कुमार, विलास विलगर, महेश पवार, यांना सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेवली. त्याचबरोबर 108 रुग्णवाहिनीचे डॉ. अनिरुद्ध सावंत हेही घटना स्थळी दाखल झालें. रात्री उशिरा पर्यंत पानबुड्याच्या माध्यमाने व पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या दोघांचा शोध कार्य सुरु होते.
Leave a Reply