चिंचवड विधानसभेत आयटी इंजिनिअर निवडणुकीच्या रिंगणात…!

पुणे : राज्यभरासह पुणे जिल्ह्यात विधानसभेची रण धुमाळी जोर धरू लागली आहे. त्यातच चिंचवड विधानसभा हा एक महतवाचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात चक्क एक आयटी इंजिनिअर उतरला आहे. सचिन सिद्धे असे या आयटी इंजिनिअरचे नाव आहे. दीड लाखहून अधिक आयटी मतदार असताना आजपर्यंत हिंजवडीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा या तीन मूलभूत गरजा ही पूर्ण करू शकलेला नाही. म्हणूनचं सचिन सिद्धे या घटकाचा आवाज विधानसभेत उठवण्यासाठी आपण निवडणुकीत उतरलो असल्याचे सिद्धे यांनी सांगितले आहे.

पहिल्यांदाच कुणी आयटी इंजिनिअर या भागात निवडणुकीसाठी उभा राहिला आहे. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे अपक्ष म्हणून सचिन सिद्धे हे निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांना एसी एअर कंडिशनर हे निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे.

त्यामुळे आतापर्यंत चिंचवडमध्ये निवडून आलेल्या आमदाराला दीड लाखाच्या आसपासचं मते मिळालेली आहेत. असे असताना चिंचवड विधानसभेतील दीड लाख आयटी मतदारांनी जर ठरवलं तर सचिन सिद्धे हे आमदार ही होऊ शकतात अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. मात्र एसी त बसून काम करणारे आयटीवाले बाहेर डोकावून त्यांच्यासाठी झगडणाऱ्या सचिन सिद्धे कडे पाहणार का ? त्याच्यावर विश्वास दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे.

*कोण आहे सचिन सिद्धे? *
सचिन सिध्दे हे पिंपरी चिंचवड शहरात कुटुंबासह राहतात. त्यांनी एमसीएस पदवी प्राप्त केली असून त्यांना ४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय आयटी अनुभव आहे आणि १६ वर्षांचा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आयटी अनुभव आहे. गेल्या ८ वर्षांपासून ते नॅनो होम्स को-ऑप हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष म्हणून सेवा देत आहेत.

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता लक्ष्मण जगताप, अश्विनी जगताप, राहुल कलाटे, शंकर जगताप अशी बड्या नेत्यांची फौज असताना आयटी इंजिनिअर असलेले सचिन शिंदे यांचा निभाव लागणार का? असे असले तरी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

हिंजवडी आयटी पार्क हा पुणे शहरातील माहत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यापासून या भागात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना या भागातील आयटी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक कंपन्यानी हिंजवडी आयटी पार्क मधून स्थलांतर केले आहे. आणखी कंपन्या जाण्याच्या मार्गांवर आहे.
त्यामुळे की काय एका आयटी इंजिनिअरला निवडणुकीत उभे रहावेशे वाटले. इंजिनिअर आमदार झाला तर या भागातील समस्या सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय जवळपास दीड लाखाहून अधिक आयटी इंजिनिअरचे मतदान देखील या भागात आहे.