Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

वाढदिवस साजरा करणाऱ्या “त्या “पोलीस अंमलदाराना पोलीस आयुक्तांचा दणका, तडकाफडकी निलंबन

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथे पोलीस स्टेशन समोर वाढदिवस साजरा करणे एका पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोले आहे. पोलीस आयुक्त या घटनेनंतर चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रवीण पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.

पोलीस अंमलदल प्रवीण पाटील यांच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांच्या पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबन केले आहे. तसेच पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड ते पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनीही धडक कारवाई केली आहे.

काय होते प्रकरण?

पोलीस अंमलदार प्रवीण पाटील याचा वाढदिवस गुरुवारी होता. मात्र बुधवारी रात्री आणि गुरुवारची सुरुवात होत असताना प्रवीण पाटील यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांनी पाटील यांच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केले. या वाढदिवसासाठी केक, आकर्षक फटाके, ड्रोन याचा वापर करण्यात आला होता. तसेच काही मित्रमंडळींनी हातात फायर गन देखील घेतली होती. पोलीस स्टेशन समोर आणि रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून हे सेलिब्रेशन सुरू होते. अनेक मित्रमंडळींनी या कार्यक्रमाचे व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवले होते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. प्रसारमाध्यमांवर बातम्या आल्यानंतर पोलीस प्रशासनाची बदनामी होत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी निर्णय घेत वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलिस अंमलदारांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »