पुणे : स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी त्याच्या गावी आणले असल्याची माहिती समोर आली आहे. दत्ता गाडे याच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी त्याला आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अतिशय गोपिनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचाचं एका भाग म्हणून आज त्याच्या गावी अणण्यात आले होते.
दत्ता गाडेच्या मोबाईलमधून जवळपास सर्वचं गोष्टींचा उलगडा होईल असे बोलले जातं आहे. दत्ता गाडेला जवळपास 20 जणांच्या टीम सोबत आणण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गाडे याने त्याच्या मोबाईल मधून कोणणाकोणाला फोन केले. त्याने मोबाईलमधून कुणाला किती पैसे पाठवले याचा तपास केला जातं आहे. तसेच मोबाईलमधून व्हिडिओ काढून तो महिलांना ब्लॅकमेल करायचा का? याचा देखील तपास केला जाणार आहे.
स्वारगेट येथे तरुणीवर अत्याचार केल्यानंत्तर गाडे हा आपल्या गुणाट या गावी आला होता. हा प्रकार माध्यमावर आल्यानंतर त्याने गावातून पलायन केले होते. 70 तासांच्या अथक प्रयत्ननंतर त्याला पकडण्यात पोलिसाना यश आले होते.
पोलिसांनी गुणाट गावात येऊन स्थानिक नागरिकांची चौकशी देखील केली असल्याची माहिती समोर येत आहे. दत्ता गाडे याने ज्या ठिकाणी मोबाईल फेकून दिला आहे. त्या जागेच शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याला आज गुणाट गावी आणल्याचे बोलले जातं आहे. गाडेच्या मोबाईलमधून आता कोणकोणत्या गोष्टींचा खुलासा होतो. कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात दररोज नवीन नवीन घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा योग्य तपास केला जात आहे.
Leave a Reply