पुणे : होळीच्या पार्शवभूमीवर पुणे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळेश्वर येथे असणाऱ्या पसरणी घाटात फोर्ड गाडी दरीत कोसळून लोणी काळभोर येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६ ), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) ही अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, (वय२४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमींना वाई येथील बेलर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोणी काळभोर परिसरातील चार मित्र महाबळेशवर येथे फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर फिरून झाल्यानंतर ते लोणी काळभोर येथे घरी येण्यासाठी निघाले होते. वाई – पाचगणी रस्त्यावर असणाऱ्या पसरणी घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट 100 फूट खोल दरीत जाऊन कोसळली. चौघाना रुग्णालयात दाखल केले मात्र, अक्षय आणि सौरभ याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तर बजरंग पर्वतराव काळभोर व वैभव काळभोर हे जखमी झाले आहेत.
Leave a Reply