Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने पत्नीने संपवल

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या भोर तालूक्यात असणाऱ्या नीरा नदीत एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये एका मृतदेह आढळला होता. या घटनेचा तपास लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने काटा काढला असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आरोपी पत्नी योगिता भिसे, आरोपी प्रियकर शिवाजी बसवंत सुतार अशी आरोपींची नावे असून सिद्धेश्वर भिसे असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रियकराच्या मदतीने आपण पतिचा काटा काढल्याची कबुली पत्नीने दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगिता भिसे आणि शिवाजी सुतार यांचे काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र पती या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसर 3 मार्च 2025 रोजी हडपसर येथील घरी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. त्यांतर त्याचा मृतदेह साड्याच्या चिंध्यानी हातापाय बांधून तो मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून तो मृतदेह दुचाकीवरून भोर जवळ असणाऱ्या सारोळा परिसरातील नीरा नदी पात्रात फेकून दिला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने, त्याचे हात व पाय बांधून, त्यास पांढरे, पिवळे व लाल रंगाचे प्लॅस्टिकच्या पोत्यात घालुन, निरा नदी पात्रात फेकुन दिले असल्याचे पोलिस तपासात समोर आले. भिसे याची पत्नी व तिच्या प्रियकराला राजगड पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. राजगड पोलिसांनी मृताच्या अंगावर असणाऱ्या शर्टच्या टॅग वरून मृताची ओळख पटवली. तसेच त्याच्या हातावरील गोंदवलेल्या खुनेवरून ओळख पटवली. विशेष म्हणजे सिद्धवश्वर याच्याच पत्नीने आपला पती बेपता असल्याची तक्रार दाखल केली होती. अनैतिक प्रेम संबंधामध्ये अडथळा ठरत असल्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »