जालना : अंतरवाली सराटीत मधील स्थगित झालेलं आमरण उपोषण 25 जानेवारी 2025 रोजी पुन्हा सुरू होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या संदर्भातील मोठी घोषणा केलीय. जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
सामूहिक आमरण उपोषणाला 25 जानेवारी 2025 रोजी अंतरवाली सराटीत सुरुवात होणार असून सरकारने 25 जानेवारी 2025 च्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात असं जरांगे म्हणालेत. 25 जानेवारीला राज्यातील सगळ्या मराठ्यांनी अंतरवाली सराटी मध्ये उपोषणाला पाठींबा देण्यासाठी यायचं असं आवाहन देखील जरांगेंनी मराठा समाजाला केलंय.