लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या ज्योतिबाला ५६ अन्न पदार्थांचा नैवेद्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा देवाला राज्यातील लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. ज्योतिबा हे देवस्थान महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याचीही विशेष चर्चा असते. ज्योतिबा देवाला मार्गशीष मासानिमित्ताने ५६ भोगांची सेवा म्हणजे ५६ प्रकारच्या अन्नाचा प्रसाद दाखवण्यात आला. या दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याला विशेष असे महत्व असते.

जोतिबाच्या भाविकांना अखंड अन्नधान्य अन् सुख संपदा प्राप्त व्हावी, या करीता हे 56 भोग अर्पण करण्यात येतात.या नैवेद्यामध्ये कडू, गोड, आंबट, तुरट, खारट अशाच चविचे सर्व पदार्थ असतात. या सर्व प्रकारच्या अन्नाची समृद्धी भक्तजनांच्या घरामध्ये यावी, अखंड जीवसृष्टीतील कोणीही जीव अन्नपाण्या वाचून उपाशी राहू नये, ही प्रार्थना यावेळी जोतिबाला करण्यात आली.