चेतक फेस्टिवलमध्ये अश्वाचे डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य…! आकर्षक अश्वानी वेधले लक्ष

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा गांवात दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी “चेतक फेस्टिवलला सुरवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये हजारो अश्वप्रेमींचे डोळ्यांचे पारणे फेडणारी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील रोहिणी गावातील माही घोडीने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले आहे.

या चेतक फेस्टिवलला 18 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. यासाठी देशभरातून घोडे दाखल झाले आहेत. या स्पर्धेत 14 आश्वानी भाग घेतला होता. पहिल्या दिवशी देशातून आलेल्या विविध अश्वांची नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या या स्पर्धेमध्ये डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य अश्वानी केले.

या स्पर्धेत प्रत्येक अश्वाला 7 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या खेळीत डौलदारपणा, खाटेवरील मनोवेधक नृत्य, आसमान झेप घेत नृत्य,पदलालित्य, नागिन नृत्य अशा अनेक कला सादर करण्यात आले आहे.

कुणी पटकावला क्रमांक

गुजरात मधील आनंद जिल्ह्यातील रोहिणी गावातील प्रदिप यादव यांची माहीने प्रथम क्रमांक पटकावला , द्वितिय क्रमांक अमरावती येथील शाहिक इम्रान यांचा राजू , तृतीय क्रमांक अहमदाबाद येथील जितूभाई यांची तेगंली , चौथा क्रमांक इंदौर येथील धनंजय यांची काजोल ,पाचवा क्रमांक बडोदा येथील मुस्ताक पठाण यांची सुर्या यांनी पटकावला. प्रथम पुरस्कार ३१ हजार , द्वितीय .२१ हजार , तृतीय ११ हजार , उर्वरित दोन अश्वांना प्रत्येकी ५ हजाराचा पुरस्कार देण्यात आला.