नागपूर : ज्या योजनेमुळे महायुतीला भरघोस असे यश मिळाले, ती लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी ही माहीती दिली. तसेच लाडकी बहीण योजनेची रक्कम अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यातच मिळणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. आम्ही सूरू केलेली एकही कल्याणकारी योजना बंद होऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे तीन हप्ते निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढचा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.