Pune: पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडत भाजपाने शिवसेनेसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र लोकसभेमध्ये शरद पवारांच्या प्रभावामुळे अजित पवारांना चांगलाच धक्का सहन करावा लागला. त्यातच त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नींचा पराभव झाला. शरद पवारांना लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळाले. मात्र आता विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी बारामती अजित पवारांनी वक्तव्य केले होते की, मी निवडून दिलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे, त्यामुळे बारामतीतून पुन्हा एकदा निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. त्यामुळे आता अजित पवार नेमकी निवडणूक कुठल्या मतदारसंघातून लढवणार याच्या चर्चा आता सुरू झाले आहेत. त्यातच सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार, अजित पवार हे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात असल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामुळे आमदार अशोक बापू पवार यांच्या विरोधात अजित पवार अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बारामती अजित पवारांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना मतदारांनी नाकारल्याने अजित पवारांनी दुसऱ्या मतदारसंघाची चाचणी सुरू केली आहे. शिरूर हवेली हा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदार संघ आहे. शिवसेना भाजपची युती असताना देखील हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघासाठी भाजप कडून कोणत्याही मुलाखती घेतल्या गेलेले नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपने सोडला असल्याचे चर्चा रंग लागले आहेत.
त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ जर अजित पवारांना मिळाला. तर तिथून शरद पवार गटाचे आमदार अशोक बापू पवार यांच्या विरोधात अजित पवार हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढल्यास अजित पवार निश्चितच विजय होतील असा विश्वास देखील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बोलून दाखवला जात आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये देखील प्रचारादरम्यान अजित पवारांनी अशोक पवारांना खोल आव्हान दिलं होतं. तू कसा आमदार होतो तेच बघतो, आता त्याच आव्हानाला अजित पवार मैदानात उतरतात की काय? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून या मतदारसंघाची चाचणी सुरू असल्याची माहिती आता जोर धरू लागली आहे.