Pune : 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल केंव्हाही वाजण्याची शक्यता आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली आहे. त्या दृष्टीने राजकीय घडमोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत मुळशीकर हे विधानसभेवर आपले तोरण बांधणार अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
भोर विधानसभा मतदार संघात भोर, वेल्हा, मुळशी हे तीन तालुके येतात. त्यात मागच्या विधनाभेवेळी काँग्रेसला ही जागा सुटली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अनेकजण निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचे शंकर मांडेकर यांनी भोर विधनसभेसाठी निवडणुकीची तयारी करत आहेत. जर जागा तर “सांगली पॅटर्न” करण्याची तयारी देखील त्यांच्याकडून केली जातं असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भोर विधानभेत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शंकर मांडेकर तर युतीकडून भाजपाचे किरण दगडे, शिंदे गटाकडून बाळासाहेब चांदेरे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून सुनील चांदेरे, रणजित शिवतारे, शिंदे गटाकडून कुलदीप कोंडेही इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत.
कोण आहेत शंकर मांडेकर
ग्रामपंचायतीपासून सुरु होऊन त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका प्रमुख, जि. प. सदस्य तसेच स्वतःच्या पत्नीला पंचायत समिती च्या सदस्या आणि सभापती म्हणूनही त्यांनी प्रचंड मताधिक्याने निवडून आणले होते. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यावर त्यांच्यावर उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आली. याकाळात त्यांनी भोर विधानसभेतील तीनही तालुक्यात आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर शिवसैनिकांना सक्रिय करुन मागील लोकसभेत आघाडीला मताधिक्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. हा सारा अनुभव पाठीशी घेऊन ते आता येणाऱ्या विधानसभेसाठी ‘आता माघार नाही ‘ अशी घोषणा देत स्वतः उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले दिसत आहेत.
भोर विधानसभेची जागा आघाडीत उद्धव ठाकरे गटाला मिळणार की प्रस्थापित काँग्रेस पक्षाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय भोरची जागा काँग्रेसकडे गेल्यास मांडेकर काय भूमिका घेणार याकडे त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासह मतदारांना उत्सुकता लागली आहे. निवडणुकिची तारीख जवळ येत असताना तिकीट मिळणार अथवा न मिळणार याचा विचार न करता मांडेकर यांनी मात्र विधानसभेच्या तयारीसाठी दंड थोपटले आहेत. हे मात्र नक्की आहे.