Pune: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मोहम्मद सैपन बागवान (17 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोपींना काही तासातच पोलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री साधारण सात ते साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी भागांमध्ये हे मुले राहतात. मंगळवारी रात्री सातच्या सुमारास मोहम्मद आणि दोन अल्पवयीन मुलांमध्ये जुन्या वादातून भांडण सुरू झाली. वाद अगदी टोकाला गेला. या वादातून त्या दोन मुलांनी आपल्या सोबत आणलेल्या धारदार शास्त्राने मोहम्मद याच्यावर सपासप वार केले. हे वार खोलपर्यंत गेल्याने गंभीर जखमी असलेल्या मोहम्मद चा मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून फळ काढला. मात्र याचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती.
पुण्याने पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दिवसागणिक पुणे आणि परिसरामध्ये खुनाचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र अल्पवयीन मुलांनी ही हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्यामुळे बागवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.