आई तेव्हा “पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा ” असा देवाचा जप करत होती

बारामती: विधानसभेच्या निवडणूका नुकत्याचा पार पडल्या. त्यात सर्वात चर्चेत राहिलेला मतदार संघ म्हणजे बारामती. यात काका विरुद्व पुतण्या अशी या लढत पाहायला मिळाली. त्यात काका म्हणजे अजित पवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. यानिमित्ताने अजितदादा पवार यांचा बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी भाषणा दरम्यान भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.. या निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी काही माध्यमांनी तर कहरच केला होता. पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर आशा बातम्या लागल्यावर आमच्या मातोश्री देवघरात जाऊन बसली. त्यावेळी माझी मोठी बहीण आईजवळ होती. तिला आई म्हणाली. रजू अक्का असं कसं झालं.. तेव्हा ती म्हटली की हे असं नाही.. आम्ही बारामतीत फिरलो आहे. काळजी करू नको. तेव्हा ती “पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा ” असा देवाचा जप करत बसली. आपल्याला 60 ते 70 टक्के मते मिळत असल्याचे त्यांनी सांगितले , अशी आपल्या आईची आठवण भर सभेत अजितदादांनी सांगितली.

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रविवारी तमाम बारामतीकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी . यावेळी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, आमदार अमोल मिटकरी, पार्थ पवार उपस्थित होते.

बारामतीकरांनी बटन दाबायला सुरुवात केली. त्याच्यात आपण मागे राहिलो नाही. सतत पुढे चाललो. बारामतीकरांचं, नागरिकांचं, अनेक कार्यकर्त्यांचं, सर्वांचेच असं मत होतं की, आपल्याला लाखांच्या पुढे मताधिक्य मिळवायचं. आणि खरोखरच बारामतीकरांनी उभ्या महाराष्ट्राला हे खरं करून दाखवलं. आजवरच्या सर्वात जास्त माझ्या राजकीय कारकिर्दीतील विकास या पंचवार्षिक मध्ये करणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकरांना दिला. यावेळी अजित पवार यांनी सांगितले कि, बारामतीकरानी लोकसभेला झटका दिला. त्यामुळे विधानसभेला धाकधूक होती.परंतु आम्ही ईव्हीएमला दोष न देता नव्या जोमाने कामाला लागलो. काही योजना आणल्या. मतदारांपुढे व्हीजन मांडले. विधानसभेला महायुती न भूतो न भविष्यती यश मिळाले. त्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. हा निकाल महाविकास आघाडीचा पचलेला नाही. त्यामुळे ते ईव्हीएमवर टीका करत आंदोलन करत आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ईव्हीएमवर शंका घेणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.