पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येसंदर्भात एकनाथ शिंदेनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे अशी मागणी पुणे शहरातील अखंड मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी केली आहे. या संदर्भात मराठा सेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या साताऱ्यातील दरे या गावी जाऊन भेट घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येसंदर्भात एकनाथ शिंदे नी स्वतः लक्ष घालून फरार अरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले ला लवकर अटक करण्याची केली मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात मराठा सेवकांनी एकनाथ शिंदे यांनी निवेदन देखील दिले आहे.
मराठा सेवकांनी निवेदनात म्हटले आहे कि, एकनाथ शिंदे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यास संतोष देशमुखांच्या हत्येची निपक्ष व पारदर्शक पणे चौकशी होईल, यावर एकनाथ शिंदे यांनी मी यामध्ये लक्ष घातल असून मी माझा दोन मंत्र्यांना मस्साजोग ला पाठवल होत आणि अरोपीना लवकर अटक होईल असे आश्वासन शिंदेनी दिले आहे.