माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची विचारपूस देखील केली. एक चांगला नेता भारताने गमवाला आहे. ते एक चांगले अर्थतज्ञ होते.

डॉ. मनमोहन सिंग यांचा अल्पपरिचय

* मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते.

* मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

* 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

* विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.