Sangali : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आचार संहिता लागल्यामुळे उमेदवारांवर अनेक निर्बंध लादली जात आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातून एक आश्चर्य करणारे घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या ओढ्यात लाखो रुपये मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळच्या वेळेत या नोटा शालेय विद्यार्थ्यांना दिसल्या. त्यानंतर या नोटा घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. मात्र या नोटा कुठून आल्या कोणी टाकल्या याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील अंबाबाई मंदिर परिसरातील सुख ओढा आहे. या ओढ्यात लाखो रुपये मिळाल्याने एकच खळबळ माजली आहे. आटपाडीतील अंबाबाई मंदिराजवळ सकाळी साडेआठच्या सुमारास काही विद्यार्थी जात असताना सुख ओड्यात काही नोटा दिसून आल्या. त्या विद्यार्थ्यांनी नोटा बघितल्यानंतर त्या नोटा खऱ्या असल्यामुळे बातमी लोकांना समजली.
https://youtube.com/shorts/gwVNTe3820E?si=ezw0VMCM44zjG2zd
आज आटपाडीचा आठवडा बाजार असल्यामुळे ही बटाकू लोकांना समल्यामुळे एवढ्यात लोकांची नोटा गोळा कारण्यासाठी एकच झुंबड उडाली. काही लोकांना पन्नास हजार, काही लोकांना तीस हजार, काही लोकांना दहा हजार, तर काही लोकांना लाखो रुपये या ओढ्यातून मिळाले आहेत.याबाबत पोलिसांना माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस पोचले आहेत पोलीस तपास करत आहेत की ह्या नोटा कुठून आल्या आणि त्या नोटा फक्त ओढ्यातच मिळत आहेत.
मात्र, या नोटा सापडल्याने येथील नागरिकांची चांगलीच जंगल झाल्याचे पाहायला मिळाले. नोटा घेण्यासाठी अक्षरशः लोकांनी घाण ओढ्यामध्ये उतरून नोटा शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांना त्यात देखील आले. मात्र, या नोटा नेमके आल्या कुठून या बातमीने मात्र चर्चेला उधाण आले होते.