पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघतात यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे
नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झालाय. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पो ने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झालाय. इतर तिघे जखमी आहेत. नाशिक हुन पुण्याच्या दिशेला येताना हा अपघात झाला आहे.
अपघातात मृत झालेल्यांची नावे :
1) देबुबाई दामू टाकळकर वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2)विनोद केरूभाऊ रोकडे 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
3)युवराज महादेव वाव्हळ वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
5)गीता बाबुराव गवारे वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
6)भाऊ रभाजी बडे वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
7)नजमा अहमद हनीफ शेख वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर
8)वशिफा वशिम इनामदार वय 5 वर्ष
9)मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे