पुणे : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षाच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करावा लागणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत स्वतः माध्यमिक आणि उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गोसावी म्हणाले की, हॉल तिकिटावर जातीचा नाहीतर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले आहे.
बारावीची परीक्षा येत्या 11फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. त्या पार्शवभूमीवर महाविद्याल्यांकडून हॉल तिकीट दिली जातं आहेत. मात्र त्यावर “कास्ट कॅटेगिरी ” असा उल्लेख पाहून पालक वर्गही चक्रवला होता. हा वेगळा कॉलम कशासाठी असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
* शरद गोसावी यांनी काय दिले स्पष्टीकरण*
गोसावी म्हणाले की, बारावीच्या हॅाल टीकीटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही. तर, प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे, ओबीसी, एसटी,एससी असा उल्लेख आहे.
सामाजिक न्याय विभागाकडुन विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यात विद्यार्थ्यांना सोय व्हावी, अडचण येऊ नये यासाठी प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखवल्यावर असतो. त्यात चुक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते. ते टाळण्यासाठी हॅाल तिकीटावर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.