बारामतीत हैदराबादच्या ११ कोटींच्या घोड्याची चर्चा, शेतकऱ्यांची व अश्वप्रेमींची बघण्यासाठी गर्दी

बारामती : आपण आपल्या आजूबाजूला अनेक कोट्यवधींच्या गाड्या बघतो लाखांपासून करोडो रुपयांपर्यंत गाड्या नागरिक खरेदी करतात. अगदी ग्रामीण भागात देखील या गया दिसू लागल्या आहेत. मात्र गाड्यांची किंमत अगदी फार तर तीन कोटीपर्यंत पोहचताहेत, म्हणजे निमशहरी भागातील उद्योजक तरी अशा गाड्या खरेदी करताना फार तर तीन कोटीपर्यंत खरेदी करतात, परंतु फक्त शौक म्हणून पाळलेल्या एखाद्या जिवंत घोड्याची किंमत जर ११ कोटी असेल तर ? आश्चर्य वाटले ना… हो, बारामतीत चक्क ११ कोटींचा घोडा चर्चेत आला आहे. त्याला पाहन्यासाठी झुंबड उडाली आहे.

बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा (हसन बिंद्रिप) सोनेरी रंगाचा एक घोडा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा घोडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची व अश्वप्रेमींची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे या घोड्याची मालेगावच्या यात्रेत ११ कोटींची किंमत सांगितली होती.

हैदराबादचे नवाब हसन बिंद्रिप यांचा हा घोडा असून त्याच्या डोळ्याचा व शरीराचा रंग एक सारखा आहे. त्यामुळे हा घोडा आकर्षित करत आहे. हा घोडा आठ वर्षाचा असून पुष्करच्या यात्रेतून हा घोडा आणि घोडी खरेदी केल्याचे नवाबांनी सांगितले. हा घोडा आम्ही फक्त मालेगावच्या यात्रेत नेला होता. आम्हाला शौक असल्याने आम्ही घोडे पाळतो. त्यामुळे बारामतीत आम्ही खास रणजीत पवार यांच्या आमंत्रणावरून बारामतीत आलो आहे. हा घोडा देशात एकमेव असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.