मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात रुटीन तपासाणीसाठी आले होते. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला त्यांचा वाढदिवस असल्याचे समजले. रुटीन चेकअपसाठी विनोद कांबळी आपल्या कुटुंबासमवेत रुग्णालयात आला होता. त्यावेळी त्यांचा वाढसदिवस साजरा करण्यात आला.
विनोद कांबळी यांना चार दिवसांपूर्वी भिवंडीतील आकृती रुग्णालयात रुटीन तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्यांना अशक्त वाटत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, डॉक्टरांनी उपचारांवर समाधान व्यक्त केले आहे. शनिवार 18 जानेवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात एक खास समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारीवर्ग आणि विनोद कांबळी यांचे कुटुंबीय पत्नी व मुलगा आणि मुलगी उपस्थित होते. यावेळी केक कापून आणि पुष्पगुच्छ तसेच फोटो फ्रेम देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पत्नी सोबतची फोटोफ्रेम पाहून विनोद कांबळी भावुक झाले आणि त्यांनी रुग्णालय प्रशासन तसेच त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले.