पुणे : विधानसभा निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली आहे. त्यात अनेक पक्षांच्या उमेदवारांची अंतिम यादी येणे बाकी असताना भाजपची पहिली यादी समो आली आहे. भाजपकडून ९९ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात पुण्यातील महत्वाच्या मतरदार संघात त्याच नेत्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात
चंद्रकांत पाटील, भोसरीमधून महेश लांडगे, तर चिंचवड मधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या मतदार संघात उत्ससाचे वातावरण आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या ऐवजी त्यांचे दीर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. नुकतंच अश्विनी जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत चिंचवडची उमेदवारी शंकर जगताप यांनाच द्यावी अशी मागणी देखील केली होती. त्याचप्रमाणेभोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले महेश लांडगे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असेल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच भोसरी विधानसभेत आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला मैदानात उतरणार हे पाहणे देखील तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.
Leave a Reply