पुणे : संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि वारकरी सांप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी चिंचवड येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताणा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रणज्योत मालवली. अशी माहिती त्यांच्या निकटवरतीयांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात मुलगी यमुना कंकाळ आणि मुलगे यशोधन साखरे व चिदम्बरेश्वर साखरे आहेत. आळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहेत.
साखरे संप्रदायाचे नाना महाराज साखरे नंतर प्रमुख म्हणून जबाबदारी, संपूर्ण महाराष्ट्रात प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन, वर्षानुवर्षे स्वस्तीश्री मासिकाचे प्रकाशन , महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, नित्यक्रमात साधकाश्रमात साधकांकरता पाठ घेणे, त्यातून अनेक साधक तयार करून आज समाजात प्रवचनकार कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत.
देहू आळंदी विकास परिसर समितीच्या माध्यमातून डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या समवेत इंद्रायणी घाटाची उभारणी मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग, महाराष्ट्रभर साखरे संप्रदायाचा मोठ्या प्रमाणावर शिष्य परिवार, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी तसेच सोहळ्यामध्ये सहभाग होता . तसेच रंगनाथ महाराज परभणीकर धर्मशाळा मार्गदर्शक, परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर सर यांच्या सहकार्याने ताम्रपटावर ज्ञानेश्वरी, गेली 35 /40 वर्षे नेवासा ते आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी दिंडी पालखी पायी सोहळयाचे आयोजन, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम केले.
1997 मध्ये आळंदीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनात प्रमुख सहभाग, पश्चात धर्मपत्नी ,दोन मुले ह.भ.प.यशोधन महाराज व ह.भ.प. चिदंबरेश्वर महाराज उच्चशिक्षित, इंजिनियर व ह .भ .प. म्हणून महाराष्ट्रभर प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून सेवा, दोन सुना ,विवाहित कन्या व जावई, नातवंडे, मोठा शिष्य परिवार. अंत्यविधीचा कार्यक्रम अंदाजे आज दुपारी चारच्या दरम्यान होईल.