पुणेकरांसाठी महत्वाची बातमी..! उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात काही भागामध्ये गुरुवारी ( दि. 23) रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे शुक्रवारी अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे. जलवाहिनी देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

२३ जानेवारीला कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी सोसायटी, जिजामाता भुयारी मार्ग, धनकवडी, स. नं. ३,४,७,८ तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी या भागांमध्ये पाणी येणार नाही तर शुक्रवारी २४ जानेवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पत्रकामध्ये म्हटले आहे.

या सर्व गोष्टींची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाणी साठवून ठेवावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.