जालना : त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही, एक जरी आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबंच्या जीवाला धोका आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
जालना येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, वाल्मीक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे, देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे, त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये, बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असून आरोपी देशमुख कुटुंब मारून टाकू शकतात अशी भीती देखील जरांगे यांनी व्यक्त केली आहे. न्याय देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
तर राज्य बंद पाडू…
एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पडू असं म्हणत तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.