पुणे : पुण्यात गुन्हेगारी कळस गाठताना पाहायला मिळत आहे. आज पुण्यातील खराडी भागामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची मशिनाच्या कात्रीने गळ्यावर वार करून हत्या केली आहे. त्यानंतर त्याने त्याचे शूट करून सत्य परिस्थिती कथन केली आणि मग तो पती पोलिसांसमोर हजर झाला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घरातल्या चिमुकल्यासमोर घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यतल्या खराडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली एवढंच नव्हे तर त्यानंतर त्या पतीने या संपूर्ण घटनेचा, रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडीओही तयार केला आणि आपण हिला का मारले याचे कारण देखील त्याने सांगितले.
त्याने हे सर्व कृत्य आपल्या लहान मुलासमोर केले. आणि त्यानंतर तो स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाल्याचा हादरवणारा प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील खराडी परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली. चंदननगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत, त्यामध्ये आणखी काय माहिती समोर येत हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.