जालना : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज जालना दौऱ्यावर होते. यावेळी ते माध्यमावर संतापल्याचे पहायाला मिळाले. माझी मीडियासोबत बोलण्याची इच्छा नाही. कोणत्याही योजनेत 2/ 4 टक्के भ्रष्टाचार होतो. या दाव्यावर कृषी मंत्र्यांनी सारवासारव करत गैरप्रकार म्हणजे भ्रष्टाचार नाही असं म्हटलंय. गैरप्रकार होणार नाही यासाठी आम्ही framer unique id card आणतोय अशी माहिती देखील कोकाटे यांनी दिली आहे.
यावेळी कोकाटे यांनी सांगितले की, कोणत्याही योजनेत गैरप्रकार होणार नाही असं सांगत आम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला पाठीशी घालायचं नाही असं स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिली. 1 रुपयात पीक विमा या योजनेत आम्हाला सुधारणा करायची आहे म्हणून समिती बसवण्यात आली आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी नवीन विमा पॉलिसी आणत आहोत. य नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे नाराज आहेत. तुम्हाला मंत्रीपद मिळालं आहे, तुम्हाला राज्यभर काम करायचं आहे; पालकमंत्री पदावरून काय अडकलं आहे असा सवाल देखील कोकाटे यांनी दादा भुसे यांना केला आहे.