रेल्वेला आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी चालत्या गाडीतून मारल्या उड्या,पण घडला अनर्थ

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पथराडे गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेने ब्रेक मारल्यानंतर आगीच्या ठिणग्या उडाल्या. आग लागल्याच्या अफवाने प्रवाशानी थेट उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेने दहा ते बारा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना …

बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका : मनोज जरांगेंनी व्यक्त केली भीती

जालना : त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही, एक जरी आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबंच्या जीवाला धोका आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. जालना येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी …

संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी पालकांनी मुलांना वेळ देण्याची गरज : निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे प्रतिपादन

पुणे : समाजात आज विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. शहर असो की ग्रामीण भाग पालकांना मुलांना देण्यासाठी पैसा आहे मात्र वेळ नाही. परिणामी मुलं, मुली नक्की काय करतात, त्यांचे मित्र – मैत्रिणी कसे आहेत याचा आई – वडिलांना पत्ता नसतो. आपलयांवर कोणाचे लक्ष नाही, कुणी आपल्याला काही बोलत नाही यातून युवा पिढीच्या मनामध्ये वाईट प्रवृत्ती …

पुण्यात विचित्र अपघात..! रिव्हर्स घेताना कार थेट भिंत तोडून कोसळली खाली

पुणे : पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमी म्हणतो. पण दिवसेंदिवस पुणे आता वेगवेगळ्या घटनानांनी चर्चेत येत आहे. पुण्यात गुन्हेगारीचा आलेख देखील वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे. एका इमारतीच्या पहिल्या मजल्यानवरून गाडी मागे घेताना वाहन चालकाच्या एका चुकीमुळे गाडी मागे घेताना थेट पहिल्या मजल्यावरून …

बारामती जिल्हा होणार?  राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितले 

बारामती: राज्यमध्ये अनेक जिल्हे वाढणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. तसेच जिल्ह्याची यादी देखील सोशल मीडियावर व्हायराल झाली होती. त्यात बारामतीसह अनेक जिल्हे नव्याने उदयास येणार आहेत. त्यात बारामती देखील आता वेगळा जिल्हा होणार आहे. यावर आता भाजपचे नेते राधा कृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अशा प्रकारच्या वावड्या कोण उठवत आहे माहित …

‌‘अजमते-ए-काश्मीर‌’ काश्मीर महोत्सवाला पुणेकरांची भरभरून दाद

पुणे : काश्मिर आणि महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा अनोखा मिलाफ आज पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते ‌‘अजमते-ए-काश्मीर‌’ या 13व्या काश्मीर महोत्सवाचे. सरहद, पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.तर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमात रसिकांनी काश्मिरी वाद्यांवर ठेका धरला. काश्मिरी …

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी..! उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात काही भागामध्ये गुरुवारी ( दि. 23) रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे. जलवाहिनी देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ जानेवारीला कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, …

शिरूरमध्ये भरवस्तीत दुकानदारावर गोळीबार..! पिस्तूल हिसकावल्याने वाचला जीव

पुणे : चाकण गोळीबाराची घटना ताजी असताना आता शिरूरमध्ये देखील व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कृष्णा वैभव जोशी रा सरदार पेठ, शिरूर ता शिरूर जि पुणे, याच्या विरुद्ध शिरूर …

पुण्यात चाललय तरी काय..! बारमध्ये गोंधळ घालणाऱ्या तरुणांना कर्मचाऱ्यांकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. बार मधल्या कर्मचाऱ्यांकडून दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायराल झाला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. …

वारकरी सांप्रदायाचे अभ्यासक डॉ. किसनमहाराज साखरे यांचे निधन,आळंदीत होणार अंत्यसंस्कार

पुणे : संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि वारकरी सांप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी चिंचवड येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताणा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि …