पुण्यातील नामांकित शाळेत मुलांवर अत्याचार, शिक्षकासह संस्थाचालकाला अटक 

पुणे : पुण्यातल्या कर्वेनगर येथे एका नामांकित शाळलेत नृत्य शिक्षकाने अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करताना हा प्रकार समोर आला आहे. जेव्हा याबाबत कुटुंबियाना समजले तेव्हा त्यांनी वारजे पोलीस स्टेशनला धाव घेत नृत्य शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसानी याची गंभीर दखल घेत त्या शिक्षकाला अटक केली …

लाडक्या बहिणींसाठी गुड news..! लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नागपूर : ज्या योजनेमुळे महायुतीला भरघोस असे यश मिळाले, ती लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी ही माहीती दिली. तसेच लाडकी बहीण योजनेची रक्कम अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यातच मिळणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. आम्ही सूरू केलेली एकही कल्याणकारी योजना …

पुण्यात महिलेचा रुद्रावतार, छेड काढणाऱ्या दारुड्याला चोपला, video आला समोर

पुणे : पुणे शहरात महिलांबाबतच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र एसटी बसमध्ये एक दारूडा एका महिलेची छेड काढत होता, त्या महिलेने संबंधित दारूड्याला चांगला चोप दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुणे येथे एसटी बसमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या …

चेतक फेस्टिवलमध्ये अश्वाचे डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य…! आकर्षक अश्वानी वेधले लक्ष

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा गांवात दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी “चेतक फेस्टिवलला सुरवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये हजारो अश्वप्रेमींचे डोळ्यांचे पारणे फेडणारी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील रोहिणी गावातील माही घोडीने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले आहे. या चेतक फेस्टिवलला 18 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. यासाठी देशभरातून घोडे दाखल …

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या ज्योतिबाला ५६ अन्न पदार्थांचा नैवेद्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा देवाला राज्यातील लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. ज्योतिबा हे देवस्थान महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याचीही विशेष चर्चा असते. ज्योतिबा देवाला मार्गशीष मासानिमित्ताने ५६ भोगांची सेवा म्हणजे ५६ प्रकारच्या अन्नाचा प्रसाद दाखवण्यात आला. या दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याला विशेष असे महत्व असते. जोतिबाच्या …

भाजपच्या मनात जे आहे, ते गृहमंत्री अमित शाहा यांच्या भाषणात आले : आदित्य ठाकरे

नागपूर : दिल्ली येथील संसद भवन येथे केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चांगलाच समाचार घेण्यात आला. “केंद्रिय गृहमंत्री यांच्या मनात जे होतं ते त्यांचं तोंडावर आले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. नागपुर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे …

बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, 10 प्रवाशी, तीन कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई : गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, नौदलाच्या या स्पीड बोटीला नवीन इंजिन लावले होते. त्यामुळे समुद्रात त्याची त्याची चाचणी सुरू होती. मात्र त्याचवेळी या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटले आणि ही बोट प्रवासी बोटीला जाऊन धडकली. अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

या दुर्देवी घटनेत 10 प्रवाशांचा आणि तीन नौदलाच्या बोटीवरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातातील 101 जणांचा वाचवण्यात यश आलं असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

माझा पत्ता कट करण्याऐवढी अजित पवारांची ताकत नाही, विजय शिवतारे यांचा हल्लाबोल 

पुणे : मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर शिवतारे यांनी वरिष्ठ नेत्यांवर आगपाखड केली. आम्ही नेत्यांचे गुलाम नाही असे म्हणतं त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनातून आपल्या मतदार संघात हजेरी लावली होती. यानंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली आहे. त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर हल्लाबोल …

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू 

  पुणे : उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्यांचे अगर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. दिवसाढवळ्या देखील या भागामध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या मानवी वस्तीचे वाटचाल करू लागला असून मनोहर देखील त्याने हल्ली करणे सुरू केले आहे. असे असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वर्धा वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला …

गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, व्हिडीओ आला समोर

मुंबई : मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळ असणारी गेट ते एलिफंटा दरम्यान जलवाहतुक सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता एका धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवाशी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. स्पीड बोट प्रवाशांना समुद्रातून घेऊन जातं असताना त्या स्पीड बोटने प्रवाशी बोटला जोरात धडक दिली. यानंतर …