छगन भुजबळ अजितदादांना सोडणार? चर्चाना आले उधाण

नाशिक : मंत्रिमंडळ विस्तार पार पड्ल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित]पवार गटाचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील होते. याबाबत भुजबळ यांनी थेट बोलण्यास सुरूवात केली आहे. वारे रे दादाचा वादा ,कसला वाद अन कसला दादा , असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर हल्लबोल केला आहे. …

गॅंग इमेजला धोका म्हणत लागला दुसरा मोका, तरी टोळीप्रमुखास जामीन मंजूर

पुणे :फरसखाना पोलीस ठाण्यात गु.र.क्र.११८/२०२४, मध्ये आरोपी यश प्रदीप जावळे याच्यावर आरोप होते की फिर्यादी हा यश जावळे मोक्यासारख्या गुन्ह्यातून सुटून देखील फिर्यादी त्याला इज्जत देत नाही आणि त्यामुळे गँग च्या इमेजला धोका निर्माण होत आहे. म्हणून त्याला जिवंत सोडणार नाही म्हणत त्याचे अपहरण करून मंगळवार पेठ पासून कॅम्प कृष्णा नगर वानवडी मोहम्मदवाडी असे मोटरसायकलवर …

शाहिद भीमसैनिक  सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे तीव्र निदर्शने आंदोलन

पुणे : परभणी येथे संविधानाच्या अवमानानंतर घडलेल्या घटने संदर्भात पोलिसांनी केलेल्या कॉबिंग ओपारेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली. रविवारी यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला.  शाहिद भीमसैनिक  सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे; दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कोंबींग ऑपरेशनचे आदेश देणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा, …

एमओसी कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे कल्याणी नगर येथे लोकार्पण

पुणे : एम. ओ. सी. कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यात आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर, पुणे येथे रुग्णसेवेसाठी रुजू केले आहे. पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उपचारांसाठी फक्त शासकीय व खाजगी इस्पितळांवर विसंबून राहणे तेथील महागडे उपचार, सेवा …

विधान भवनात चिमुकल्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान चालीसा पठण

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. विधानसभेत जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी ‘वेद’नामक एक चिमुकला विधानभवनात आला होता. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा त्याने हनुमान चालीसा म्हणून दाखवली, ज्यावेळी तो चुकू लागला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याला सांभाळून घेत हनुमान चालीसाचे पठण पूर्ण केला . याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर …

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलर चालक याचा जागीच मृत्यू

मुंबई : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खैरेवाडी येथे ट्रेलरचा दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागेवर मृत्यू झाला आहे. पवन शिवाजी जाधव (वय- ३३) असे मृत ट्रेलर चालकाचे नाव असून नागोठणे पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यात अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी …

संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.  रिपब्लिकन पक्षाची मागणी

पुणे : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचे अवारण फोडून ती प्रतिकृती त्या ठिकाणावरून बाहेर काढली अशा पध्दतीने पवित्र भारतीय संविधानाचा अवमान करून विटंबना करण्यात आली आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) , पुणे  शहरच्या …

आत्मज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी वन्नेस संस्थेतर्फे रविवारी कार्यक्रम, विनामूल्य कार्यक्रम, सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : तुमची आंतरिक स्थिती तुमच्या जीवनात घटना आणि परिस्थिती ओढवून घेते. जर तुम्ही अराजकतेचे प्रगतीमध्ये रूपांतर करू इच्छित असाल तर चैतन्याच्या शक्तिशाली अवस्थेला जागृत करणे हे सर्वात शक्तिशाली उत्प्रेरक असू शकते. मुक्ती गुरु श्री कृष्णाजी यांच्या नेतृत्वाखालील हा ४ तासांचा “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” कार्यक्रम तुमच्यासाठी ऐश्वर्य चैतन्याचे एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करते. या सर्वांचा अनुभव …

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळातील तरुणांचे अनोखे साहस

८०० फुटांवरुन झळकावला तीस फुटी बॅनर मावळ : अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मावळातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले आहे. अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशा आशयाचा तीस फुटाचा मोठा बॅनर ८०० फुट उंचीच्या नागफणी कड्यावरून झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला …

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार मुरलीधर मोहोळ? नंतर स्वतःच दिले स्पष्टीकरण

पुणे : राज्याच्या राजकारणात महायुती सरकार संपूर्ण ताकतीनिशी यश मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणारा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना आता आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा आता मुख्यमंत्री पदासाठी सुरू झाली आहे. मात्र …