महिला पत्रकाराला उमेदवाराच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याची धमकी

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे : विरोधात वार्तांकन का करतेस, असा जाब विचारत एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या दोन नातेवाईकांसह चौघांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली आहे. लोणावळा …

अशोक पवारांच्या सभेअगोदर निषेधाचे फलक, पोलिसांनी शेतकऱ्यांना पोलीस चौकीत बसवले

शिरूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रचार सभेच्या अगोदर निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप या शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे येथे अशोक पवार यांची प्रचार सभा होणार होती. मात्र या सभे …

उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही : चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मुंबई : अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला, असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं …

शिरूर विधानसभेत वाघोली ठरणार गेमचेंजर,महायुतीची भक्कम व्यवहरचना

पुणे : वाघोली (ता.हवेली) शिरूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यातील लढत अधिकच रंगतदार होत आहे. वाघोली या निर्णायक गावात महायुतीची स्थिती भक्कम असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि समर्थकांनी मोठ्या जोशात प्रचारास सुरुवात केली असून, वाघोलीतील परिवर्तनाची हाक मतदारांना आवाहन …

पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मतांनी माऊली कटके निवडून येणार : प्रदीप कंद

डिंग्रजवाडी येथे माऊली कटके यांचे जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत भव्यदिव्य स्वागत शिरूर : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) आमदार अशोक पवार हे बंद सम्राट असून घोडगंगा कारखाना बंद पाडण्याचे पाप, शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे महापाप केले आहे. यशवंत कारखाना सुरू करतो म्हणत घोडगंगा बंद पाडला. यशवंत तर सुरू नाही केला. पण घोडगंगेचा यशवंत करत बंद पाडला. …

शिरूर विधानसभेत माऊली कटकेंची चर्चा…!प्रदीप कंद यांच्या साथीने महायुती लावणार ताकत

शिरूर : विधानसभेची रनधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यात शिरूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना टक्कर देण्यासाठी महायीतिकडून माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे शिरूर विधानसभेची लढत अत्यंत चूरशीची होणार असल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे शरद पवरांच्या शिलेदाराला अजित पवारांचा शिलेदार भारी पडणार अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. …

चिंचवडचे महायुतीचे उमेदवार राहुल कलाटे विरोधात अदखल पात्र गुन्हा…! वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवाराला धमकी

पुणे : चिंचवड विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवार शंकर जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, काल अर्ज अर्ज भरण्यासाठी निघालेल्या उमेदवाराला तू अर्ज भरला तर तुला पाहून घेईन, अशी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद …

लोकशाहीर पठ्ठे बापूराव ह्यांच्या सुनेचा एकमेव कायदेशीर वारस असल्याचा दावा

पुणे : विसाव्या शतकाचा कालखंड म्हणजे तमाशाचा सुवर्णकाळ. पठ्ठे बापूराव नावाचे ‘मिथक’ निर्माण झाले ते याच कालखंडात. लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहिराची सांगीतिक यशोगाथा मराठी रुपेरी पडद्यावर येणार असतानाच ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांच्या सुनेने श्रीमती नलिनी गोविंद कुलकर्णी यांनी श्री श्रीधर कृष्णा कुलकर्णी तथा लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सर्व गोष्टींच्या एकमेव कायदेशीर वारस असल्याचे सांगितले …

शिरूरमध्ये अजिदादांचा शिलेदार माऊली कटके यांची अशोक पवारांशी थेट लढत

शिरूर (पुणे ):शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार यांनी तगडाकडे मैदानात उतरवला आहे. त्यामुळे शिरूर विधानसभेचा अजित पवार गटाचा जागेचा तिढा सुटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवर सस्पेन्स कायम होता. यामुळे भाजपचे नेते प्रदीप कंद यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे शरद पवार …

दिवे घाटात दरड कोसळली….! भला मोठा दगड आला रस्त्यावर

पुणे : पुण्यातील दिवे घाट परिसरा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवेघाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. अचानक दरड कोसळल्याने वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली. दिवे घाटामध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी साधारण साडेसातच्या सुमारास पुण्यातील दिवे …