वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद : माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांचे मत

मांडवगण फराटा, ( शिरूर ) : दिवसेंदिवस शिक्षणाच्या पद्धती बदलत असुन त्या दृष्टीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातुन जी नवीन पिढीसाठी शिक्षण दिले जात आहे, ते काम कौतुकास्पद असल्याचे मत माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित …

अभिमन्यू खोतकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण

जालना : शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. खोतकर यांच्या मुलाने अचानक भेट घेतल्याने चर्चाना उधाण आले आहे. अभिमन्यू खोतकरांनी अचानकपणे अंतरवाली सराटीत येऊन जरांगेंची भेट घेत त्यांच्या सोबत चर्चा केलीय. अभिमन्यू खोतकर यांचे वडील तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे जालना विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. …

शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र …

जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी “राजा”ला निरोप

पुणे : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे बैलगाडा शर्यत. याच क्षेत्रातले नावाजलेले नाव गारुडीबाबा बैलगाडा संघटनेतील बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी म्हणून ओळख असलेल्या स्व. बबन शिवराम वंडेकर यांच्या फायनल सम्राट असलेल्या “राजा” नावाच्या बैलाने वयाच्या २२ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. आज त्याचा दशक्रिया विधी पार पडला. हिंदकेसरी राजा पिंपरी पेंढार गावातील गायमुखवाडी परिसरातील वंडेकर कुटुंबाचा …

शिरूरसाठी अजितदादादांनी उमेदवार शोधला, माऊली कटके यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातुन एकमेव आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. लोकसभेत त्याचा मोठा फायदा शरद पवार गटाला आणि अमोल कोल्हे यांना झाला. मात्र आता विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवारांना उमेदवार मिळत नव्हता. मात्र आता माजी जिल्हा परिषद …

सुरज चव्हाण याचा “राजराणी” चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, प्रदर्शन थांबवण्याची मागणी

पुणे : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा नुकताच प्रदर्शित झालेला राजा राणी हा चित्रपट समाजासाठी घातक असून यान चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे म्हणून त्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठाहून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल असा निर्वाळीचा इशारा प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी  श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित …

शिरूर विधानसभेसाठी अशोक पवार यांचे पारडे जड, महायुतीला उमेदवारच मिळेना

शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पूणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार शरद पवार यांना सोडून गेले. मात्र शिरूर लोकसभेचे आमदार अशोक पवार हे एकमेव आमदार असे होते त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा देखील होणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत अशोक पवार हे महाविकास आघाडीचे शिरूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहे, …

चित्तथरारक एअर शोद्वारे फ्रान्सच्या कलाकारांनी जिंकली पुणेकरांची मने

पुणे : मैदानात रोवलेले तीन लवचिक खांब… त्यावर संगीताच्या तालावर चपळतेने चढून काळजाचा ठोका चुकवणा-या कसरती करणारे कलाकार… वेगवेगेळ्या चित्तथरारक करसतींना मिळणारी प्रेक्षकांची उत्फूर्त दाद…. फ्रान्सच्या कलाकारांनी हवेतील वेगवेगळ्या कसरतींद्वारे दाखवलेल्या अचूकतेची आणि उत्कृष्टतेची एक झलक पाहून पुणेकर प्रेक्षक अक्षरश: थक्क झाले. पुणेकरांना हा अनोख्या कसरतींचा एअर शो रविवारी अनुभवला. निमित्त होते दी फ्रेंच इन्स्टीट्यूट …

विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी समोर, चंद्रकांत पाटील , महेश लांडगे, शंकर जगताप यांना उमेदवारी

पुणे : विधानसभा निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली आहे. त्यात अनेक पक्षांच्या उमेदवारांची अंतिम यादी येणे बाकी असताना भाजपची पहिली यादी समो आली आहे. भाजपकडून ९९ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात पुण्यातील महत्वाच्या मतरदार संघात त्याच नेत्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातचंद्रकांत पाटील, भोसरीमधून महेश लांडगे, तर चिंचवड मधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ …

मी शरद पवार साहेबांना सोडण्याचा प्रश्नच नाही : दिलीप वळसे पाटील

पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच मतदार संघात राजकीय घडामोडी घडतं आहेत. त्यातच आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं? पण शरद पवारांना सोडायचा प्रश्नच येत नाही. करापण बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नसतात, असे दिलीप वळसे …