जयंतरावांना आपला मुलगा आमदार होत नाही याच दुखणं, आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

सांगली : अडीच वर्ष जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते, पण त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केले. जयंतरावांना एकच दुखणं आहे, आर आर पाटील यांचा मुलगा आमदार झाला, आपला मुलगा अद्याप आमदार झाला नाही याचा टेन्शन आल आहे. तसेच आर आर पाटलांबरोबर असणाऱ्या अनेक नेत्यांना देखील,आपला मुलगा आमदार झाला नाही, याचं दुखणं आहे, पण तुमची लायकी आणि …

Express वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी…! तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू असून 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत या लांबीत ब्लॉक घेण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून …

चाकण औद्योगिक वसाहतीत उद्योजकावर फायरिंग, पोलीस घटनास्थळी दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच माळुंगे पोलीस स्टेशन हद्दीमधील वरळी परिसरात असणारे एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत …

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे: पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये होणार्‍या वार्षिक फ्लॉवर शोची तयारी जोरात सुरू आहे. यावेळी पुष्प प्रदर्शन 24 जानेवारी ते 27 जानेवारी असे चार दिवस आयोजित केले जाईल. या पुष्प प्रदर्शनमध्ये गुलाब, झेंडू, अभिनेता ध्वज, जरबेरा, शेवंती, यासह विविध प्रकारची ऋतू आणि ऋतूतील सुंदर आणि अद्वितीय फुले पाहायला मिळतील. निशिगंधा प्रदर्शित होईल. याशिवाय, या पुष्प प्रदर्शनात …

रायगड, नाशिकचे पालकमंत्रीपदाला स्थगिती! अदिती तटकरे आणि गिरीश महाजनांना धक्का

मुंबई : पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच महायुतिचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे एका दिवसात दोन जिल्ह्याचे पालकांमंत्री पद रद्द करण्याची वेळ राज्य सरकारावर आली आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना धक्का बसला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचे पालकमंत्री पद …

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला विवाह बंधनात

नवी दिल्ली : जागतिक ऑलम्पिक स्पर्धेत भारताला दोन वेळा पदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा शुभविवाह केला आहे. सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करून त्याने ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून नीरज चोप्रा याच्या लग्नाची चर्चा रंगली होती. नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी असे असून ती सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. खूप जवळचे मित्रमंडळी …

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे : राज्यपाल

पुणे : ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता …

रुग्णालयातच साजरा केला विनोद कांबळी यांचा वाढदिवस; फोटो फ्रेम पाहून कांबळी भावुक

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात रुटीन तपासाणीसाठी आले होते. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला त्यांचा वाढदिवस असल्याचे समजले. रुटीन चेकअपसाठी विनोद कांबळी आपल्या कुटुंबासमवेत रुग्णालयात आला होता. त्यावेळी त्यांचा वाढसदिवस साजरा करण्यात आला. विनोद कांबळी यांना चार दिवसांपूर्वी भिवंडीतील आकृती रुग्णालयात रुटीन तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्यांना अशक्त वाटत असल्याने डॉक्टरांच्या …

सोलापुरात चक्क कोंबड्या पितायेत दारू…! कारण ऐकून व्हाल थक्क, शेतकऱ्याची भन्नाट कल्पना

सोलापूर : दारूचे व्यसन हे संसार उद्धस्त करत. अनेकांना आपले जीव देखील या दारुमुळे गमवावे लागले आहेत. अनेकांनाच्या किडन्या फेल देखील झाल्या आहेत. मात्र कोंबड्या याला अपवाद ठरल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोंबड्या चक्क देशी दारू पिऊन रोगमुक्त झाल्या आहेत. कोंबड्यामध्ये मर नावाचा साथीचा आजार आला आहे. या कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात …

बोपोडी येथे मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

पुणे : पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर मित्रपरिवार आणि रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन , एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आज बोपोडी येथे सम्यक विहार व विकास केंद्र या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी चा लाभ घेतला …